पतिव्रता नेणे आणिकां
8.
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावे पति ध्यानी मनी ॥१॥
तैसे माझे मन एकविध झाले । नावडे विठ्ठलेविणे दुजे ॥२॥
सूर्यविकारिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेसी ॥३॥
तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोले आणिकांचे नावडती ॥४॥
