फुलवरा ३९३७
3937.
फुलवरा ३९३७
पिंडाण्ड ब्रह्मांड अंतरी दैवतभिन्नाकृति वो । शोधोनि पहाता अवघे चराचरव्यापक घनसंभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रजतमसत्वाची आरती वो । ऐसे जाणोनि केली उभवणीं । द्वैत सारुनी परि तो मनी । एक हरि अंकीला । तुजम्यां फुलवरा बांधिला ॥१॥जय जगदंबे पुर्ण कदंबे।जग उद्बोधे । देहतुज अर्पिला । तुजम्यां फुलवराबांधिला॥ध्रु.॥आई भवानी थोर जाणोनि तिजम्यांउपासिले वो । हाती देऊन परडी तिने मज भिकेसीलाविले वो । खुळा पांगुळा करुनी आपणा जवळीबैसविले वो । उदो अस्तुचे भरे । गरगरा फिरे । भुतबावरे । तो मज व्यर्थशीण वाटलाश खंडोबासीनवस करुनी मुरळी होऊनी बैसले वो । आपुले जेका सखे सज्जन ते विवंचुनी भरी भरले वो । वारीमागतां पोट भरेना । बहु श्रम पावले वो । श्वानचियेपरी । वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परितो हरि नाहीदेखिला ॥३॥ माझे घरी पाहुणा । भैरव येऊनीबैसला वो । त्रिगुणाचा त्रिशुळ घेऊनी प्रपंचविस्तारिला वो । जोगी बोलाऊनी पतर भरुनीभराडम्यां घातिला वो । ऐंशी वरदळे सोशिली बळेंजाली निर्फळें । सुखाचा लेश नाही देखिला ॥४॥ मुंजाबासी डांक घालुनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करुनीं त्यावरी बैसविली वों । धुपदिप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिने मजनाडीले । दु:ख भोगीले । सुख नासलें । मग म्यांढकलुन दिले तिला ॥५॥ ऐंशी दैवते केलीं अनंतेनवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीगळां येउनी पडिले वों । बहुजाचिलें दु:ख भोगिले । चोदिशीव्यापिले वो । जालेंमी उदास । धरिली कास । सोडुनी आस । पंढरी पाहुन जीव माझा हर्षला ॥६॥वैकुंठाचे निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्याची गांठ पडली तेणे दिधला अभयकर वो । त्याचे संगती गेले भक्तीने देखीले भीमातीर वो । परात्पर सोयरा पुंडलिक बरा । दिधला थारा । तेणेंमजबुडतां हात दिधला॥७॥डोळा घालुनी अंजनघेउनी गेले मज राउळीं वो । विटेवरी जगदंबाएकाएकी नयनी देखिली वों । मनोभावें वरदळ वृत्तीदेहाची खुंटली वो । एका जनार्दनी भले । द्वैत हारपले । ऐक्य संचले । जन्ममरणाचा पट फाटला ॥८॥
