बरे झाले आजिवरी । ना
4043.
बरे झाले आजिवरी । नाही पडिलो मृत्युचे आहारी । वांचोन आलो येथवरी । उरले ते हरी तुम्हा समर्पण ॥१॥
दिला या काळे अवकाश । नाही पावले आयुष्य नाश । कार्या कारण उरले शेष । गेले ते भूस जावो परते ॥धृपद॥
बुडणे खोटे पावता थडी । स्वप्नी जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटी गोड घास ॥२॥
तुह्मा पावविली हाक । तेणे निरसला धाक । तुमचे भाते हे कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥
रवीच्या नावे निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश । आता कैचा आम्हा दोष । तू जगदीश कैवारी ॥४॥
आता जळो देह सुख दंभ मान । न करी तयाचे साधन । तू जगदादि नारायण । आलो शरण तुका म्हणे ॥५॥
अर्थ :
हे देवा मी आतापर्यंत मृत्यूच्या आहारी पडलो नाही हे फार बरे झाले. हे हरी आतापर्यंत वाचून म्हणजे जिवंत राहुन मी इथपर्यंत आलो आहे आता उरलेले आयुष्य तुम्हाला समर्पित आहे. काळाने आतापर्यंत मला अवकाश दिला त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याचा नाश झाला नाही. व्यर्थ भूश्याप्रमाणे आतापर्यंत माझे आयुष्य जे व्यर्थ गेले ते जावो परते परंतू आता माझे सच्चिदानंद पदवी प्राप्त करुन घेण्याचे कार्य मी माझ्या आयुष्याच्या साधनेने प्राप्त करुन घेणार आहे. एखादा मनुष्य पाण्यात पडल्यानंतर बुडायला लागल्यावर थोडया वेळाने नदीच्या कडेला पोहोचला की त्याचे बुडणे जसे व्यर्थ ठरते किंवा एखादया मनुष्याची स्वप्नामध्ये खूप हालअपेष्टा झाली, परंतू एकदा की तो जागा झाला तर त्याचे हाल हे व्यर्थ ठरतात. किंवा जेवण झाल्यानंतर शेवटी गोड घास खाण्यास मिळावा त्यावेळी जसा आनंद होतो त्याप्रमाणे हे हरी शेवटी तुम
