वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

अनुपम्य तेजे धवळले ब

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074229 · अभंग क्र. ५८८

588.
अनुपम्य तेजे धवळले ब्रह्मांड ।
विश्वरूपी अखंड तदाकार ॥१॥
रसी रस मुरे प्रेमाचे स्फुंदन ।
एकरूपी धन हरि माझा ॥२॥
नाद आणि ज्योती परिपूर्ण आम्हा ।
परेसी महात्मा उजेडला ॥३॥
जाला अरूणोदयो उजळले सूर्यतेज ।
त्याहुनी सतेज तेज आले ॥४॥
हरपल्या रश्मी देहभाव हरि ।
ऋद्धिसिद्धि कामारी जाल्या कैंशा ॥५॥
निवृत्ति उपदेश ज्ञानिया लाधला ।
तत्त्वी तत्त्व बोधला ज्ञानदेव ॥६॥

अर्थ :
परमात्म्याच्या अगाध तेजाने सर्व ब्रह्मांड शुद्ध झाले आहे. सर्व जगांत एक परमात्माच भरला आहे. अशी तदाकार रूपाने अखंड प्रतिती आली. आनंदरस व प्रेमाचे स्फुंदन ही दोन्ही परमात्मप्रेमात ऐक्य पावल्यामुळे तो एक श्रीहरिच एक रुपाने त्रैलोक्यात व्यापला आहे. अशी प्रतिती आली अशी स्थिती झाली असता बाकीच्या गोष्टीची काय कथा. परिपूर्ण नाद आणि ज्योती हा परा म्हणजे ज्ञान त्यासह वर्तमान माझ्या अंतःकरणात शिरती झाली. सूर्योदय झाला असता सूर्याच्या तेजाने विश्व उजळले जाते. त्या सूर्यतेजाहूनही अधिक सतेज परमात्मतत्त्व आहे. या परमात्म तेजामुळे सर्व वृत्ती हरपून गेल्या आणि रिद्धीसिद्धी या दासी मला निवृत्तीरायांनी उपदेश केल्यामुळे झाल्या व परमात्मतत्त्वाचा बोध झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग