वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

भुलणे चालणे ईश्वराशी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074440 · अभंग क्र. ४९४

494.
भुलणे चालणे ईश्वराशी नाही ।
जैसा असे पाही तैसा असे ॥१॥
जरी भिन्नभेद तरी सर्वज्ञत्व ।
कासया समत्व नाम त्यासी ॥२॥
सूर्याशी प्रकाश सूर्यचि करीत ।
ईश्वर जाणत ईश्वराशी ॥३॥
आपुली पोकळी आकाशचि जाणे ।
ईश्वरचि लेणे जग लेई ॥४॥
सहज अभेद वस्तु अगोचर ।
म्हणे ज्ञानेश्वर तेचि रूप ॥५॥

अर्थ :
विसरून जाणे, चालणे, वगैरे क्रिया परमात्म्याला नाही. तो जसा आहे, तसाच आहे. जर वेगवेगळे क्रियारूप भेद त्याच्याठिकाणी असतील तर त्याला सर्वज्ञ सर्वव्यापी कसे म्हणता येईल. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाशन सूर्यच करतो. त्याप्रमाणे ईश्वरच ईश्वराला जाणतो. किंवा आपली पोकळी आकाशालाच कळते. त्याप्रमाणे जगद्रूप अलंकार घातलेले ईश्वराचे स्वरूप ईश्वरालाच माहित. जी अव्यक्त व भेदरहित वस्तु तेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग