अंगावरी आलिया घाव ।
2152.
अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥
काया वाचा शरण आता । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥
मुख्य आधी पाहिजे भाव । तेणे देव कव घाली ॥३॥
एका जनार्दनी भावापाठीं । धावे उठाउठी देव मागे ॥४॥