हरिश्चंद्र राजा होता
2111.
हरिश्चंद्र राजा होता सत्त्वगुणी | वाहातसे पाणी डोंबाघरी ॥१॥
सत्य पतिब्रता तारामति राणी | राहिली भोगोनी कायाक्लेश ॥२॥
भरते ऐकता मातेचे वचन | श्रीरामदर्शन कैसे घडे ॥३॥
माता पिता सर्व अव्हेरी जनक | नामा म्हणे भाक प्रारब्ध हे ॥४॥
