बहु मार्ग बहुतापरी ।
381.
बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥
ज्या ज्या मार्गे जाता वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥
जेथे नाही कार्माकार्मा । सोपे वर्म पंढरीये ॥३॥
न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥
म्हणोनि पंढरीसी जावे । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥
