तव त्या म्हणे रे गडि
120.
तव त्या म्हणे रे गडिहो ऐका ।
उतरुनी हाचि आणू निका ।
असेल चपळ गडी जो नेटका ।
तेणे चढावे वृक्षावरी ॥१॥
तव ते म्हणती नहो बाहेरी ।
आम्ही बळकट चढावाया वरी ।
वृक्षही उंच गगनोदरी ।
डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥
म्हणे गडीहो तरी तळींचि रहा ।
आणितो जाऊनि चेंडु पहा ।
ते म्हणती रे अचपळा रहा ।
निमित्य आम्हावरी आणू नको ॥३॥
एका दोन कामी वांचलासी ।
तैसेचि येथेही पाहतोसी ।
परी हे बुध्दि नव्हे ऐसी ।
वेळा सारखिया नसताती ॥४॥
पाय निसरोनिया जाईल ।
अथवा खांची उपटी उपटे ।
हांसे इतरांचे होईल ।
आपणही जिवे घातावे ॥५॥
ऐसे न करिती शहाणे ।
विचारुनी पहाती सर्वगुणे ।
मग हितावह तोचि घरणे ।
दृढ निश्रचये मानसी ॥६॥
निळा म्हणे सांगता ऐसे ।
न मानिजे कृष्ण मानसे ।
मनीचे कार्य जे अनारिसे ।
ते नेदीचि कळो कोणासी ॥७॥
