वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

निज तेज बीज नाठवे हे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074227 · अभंग क्र. ५८१

581.
निज तेज बीज नाठवे हे देहो ।
हरपला मोहो संदेहेसी ॥१॥
काय करू सये कोठे गेला हरि ।
देही देह मापारी हरि जाला ॥२॥
विदेह पै गंगा पारूषली चित्ती ।
चिद्रूपी हे वृत्ति बुडियेली ॥३॥
गुरूलिंगी भेटी निवृत्ति तटाक ।
देखिले सम्यक् समरसे ॥४॥
दत्त चित्त वृत्ति ज्ञेयज्ञान कळा ।
समाधि सोहळा विष्णुरूपी ॥५॥
ज्ञानदेव गाय हरिनामामृत ।
निवृत्ति त्वरित घरभरी ॥६॥

अर्थ :
सर्व जगताला अधिष्ठान जे हे तुझे तेजबीज ब्रह्मस्वरूप त्याचे ठिकाणी संशयासह वर्तमान देहसंबंधी मोह हारपून गेल्यामुळे त्याचा आठवही होत नाही. काय करू रे बाळा ! आता तुझ्या देहाच्या जन्ममरणाचा मापारी. हरिच झाला आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी जन्ममरण नाहीच. विदेहरूप गंगासुद्धा तुझ्या देहांत परकी झाली. म्हणजे ती विदेहवृत्ति चिद्रूपातच बुडूनी गेली. तुला उपदेश कर्ता जो मी त्याच्या तटाकावर उभे राहन म्हणजे त्याची सहायता घेऊन सम्यक् प्रकारे गुरूलिंगाचे तुला दर्शन झाले. माझ्या उपदेशाकडे तू चित्तवृत्ती दिलीस म्हणून ज्ञेय, ज्ञान, समाधी, इत्यादिकांचा सोहळा विष्णुरुप झाला. हरिनामामृताचे मी गायन केल्यामुळे माझे निवृत्तीनाथ फार संतुष्ट झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग