वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मग पाय ठेऊनि खांदिये

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089870 · अभंग क्र. १२२

122.
मग पाय ठेऊनि खांदियेवरी ।
चेंडा झेपावला हरी ।
ऐसे देखोनिया इतरी ।
केला कल्लोळ खालुता ॥१॥
म्हणती रे नको नको हरी ।
जाऊ तिये खांदीयेवरी ।
आम्हा तुझी आई घरी ।
गांजिल ऐसे करु नको ॥२॥
तयांप्रति म्हणोनि बरे ।
खांदि मोडियली भारे ।
ते आपण येकचि सरे ।
पाडियला डोहांत ॥३॥
देखानिया ते अवघे गडी ।
शंख करिती थडोथडी ।
अंगे घालोनिया गडबडी ।
लोळती भुई आक्रंदत ॥४॥
म्हणति गेला रे महादाश्रय ।
तयाविण आम्ही पोरटी काय ।
नाही दवावया ठाय ।
तोंड आता कोणीकडे ॥५॥
काय म्हणेल ते दसवंती ।
लोकहि आम्हा फजीत करिति ।
म्हणती का जाऊ दिला श्रीपती ।
तुम्ही तया झाडावरी ॥६॥
हाणेनि घेती उरावरी ।
मस्तका ताडिती निजकरी ।
गाई हांबरडे हाणीती वरी ।
दु:ख भारी न सोसवे ॥७॥
गावामाजी गेली वार्ता ।
लोकहि धावले ऐकता ।
नंदयशोदे प्राणात अवस्था ।
हो सरली तेचि क्षणी ॥८॥
घरोघरी हाहाकार ।
शोक करिती नारीनर ।
ठाकूनि आली तीर ।
तव तो कहार गोवळांचा ॥९॥
यशोदा म्हणे दावा हरी ।
केउता गेलारे गे मुरारी ।
नंदही दीर्घ रुदन करी ।
म्हणे हरपला गोविंद ॥१०॥
दारिद्रीया हाती रत्न ।
लागले न धरे करिता यत्न ।
तैसि परी झाली म्हणोन ।
नंद लोळे गडबडा ॥११॥
असो तो दु:खार्णव सांगता ।
पाषाण फुटती तत्त्वता ।
मग समोखुनीया उभयता ।
लोक घेऊनि घरा आले ॥१२॥
एका कृष्णविणं नगर ।
वोस दिसे भयंकर ।
दु:खार्णवी नारीनर ।
पडले तैसेचि मातापिता ॥१३॥
निळा म्हणे इकडे हरि ।
रिगोनिया सर्पविवरी ।
विखार काडिला बाहेरी ।
काळया तो नाथुनि ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग