रावणे हे केले लग्नाम
299.
रावणे हे केले लग्नामाजी विघ्न | असे की स्मरण तुजलागी ॥१॥
आणी रे धनुष्य मारीन रावणा | लंका बिभीषणा देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा | हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा | पायवाट करा जावयासी ॥४॥
लंकेपुढे मोठे माजवीन रण | तोडीन बंधन सुरवरांचे ॥५॥
विश्वामित्रयाग नेईन मी सिद्धी | मारीन कुबुद्धि दोघांजणा ॥६॥
खर दूषणांचा घेईन मी प्राण | धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७॥
ध्याती मज त्यांची बहुत आवडी | न विसंबे घडी त्यांसी एक ॥८॥
बोलिला वाल्मिक तैसेचि करीन | वर्तोनि दाविन नामा म्हणे ॥९॥
