आजिवरी काळ वृथाचि गे
995.
आजिवरी काळ वृथाचि गेला ।
जेथुनिया झाला सृष्टिक्रम ॥१॥
ऐसेचि नाना धरिता वेष ।
न तुटती पाश कर्माचे ॥२॥
केव्हा स्वर्ग केव्हा नर्क ।
केव्हा दु:खदायक संसार ॥३॥
निळा म्हणे न पुरे घडी ।
ओढाओढी कल्प जाता ॥४॥
995.
आजिवरी काळ वृथाचि गेला ।
जेथुनिया झाला सृष्टिक्रम ॥१॥
ऐसेचि नाना धरिता वेष ।
न तुटती पाश कर्माचे ॥२॥
केव्हा स्वर्ग केव्हा नर्क ।
केव्हा दु:खदायक संसार ॥३॥
निळा म्हणे न पुरे घडी ।
ओढाओढी कल्प जाता ॥४॥