जनसमुदाय मिळाला । धि
292.
जनसमुदाय मिळाला । धिःकारिती नामयाला ॥1॥
विप्र बोलावुनी वेगे । प्रेत नेले चंद्रभागे ॥2॥
मोठे रचुनी सरण । मध्ये निजविला ब्राम्हण ॥3॥
शय्यागमनी पहूडला । म्हणे अग्नि द्या आम्हाला ॥4॥
अग्नि दिला जयाप्रती । देव विमानी पाहती ॥5॥
विस्मित झाला चक्रपाणी । प्रगट होय म्हणे जनी ॥6॥
