वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

अज्ञाना स्वरूप निज व

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074437 · अभंग क्र. ४९६

496.
अज्ञाना स्वरूप निज विचारिता ।
संदेह तत्वता घालिताती ॥१॥
कैंचि गा विश्रांति दुर्जनाच्या संगी ।
दाटोनिया भोगी नरकदुःख ॥२॥
विषयाकारणे जाहले गुरू शिष्य ।
अनुभव अभ्यास स्वप्नी नाही ॥३॥
शब्दची करूनी बोलताती ब्रह्म ।
अंतरीचे वर्म नेणतीच ॥४॥
तयाची संगती त्यजी ज्ञानेश्वर ।
जाहला निर्विकार संतसंगे ॥५॥

अर्थ :
अज्ञानी गुरूला शिष्याने आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचारले असता तो त्याला घोटाळ्यांतच घालतो. दुर्जनाच्या संगतीने सुख होणार कोठे? अशा संगत धरून शिष्य नरकादि अनेक दुःखे मात्र भोगतो. त्यांचा तो गुरूशिष्यपणा विषयोपभोगाकरिता असतो. त्यांच्या जवळ ब्रह्मचिंतनादि अभ्यास स्वप्नातही नसतो. केवळ शब्दाने ब्रह्माचा उच्चार करितात. पण तात्त्विक ब्रह्मज्ञानाचे वर्म माहित नसते. अशा भोंदूची संगती सोडून केवळ सत्संगतीने आम्ही निर्विकार बनलो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग