वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

वाराणसी यात्रे जाईन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074919 · अभंग क्र. ४६५

465.
वाराणसी यात्रे जाईन ।
प्रयाग तीर्थ पाहिन ।
त्रिवेणिये स्नान करिन ।
परी मी वीट नव्हेन ॥१॥
विेठोबा पाईची वीट ।
मी कई बा होईन ॥धृपद॥
गोदावरी यात्रे जाईन ।
बारा वरुषाचे फळ लाहीन ।
अब्जकतीर्थी स्नान करीन ।
परी मी वीट नव्हेन ॥३॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन ।
श्रीशैल्य शिखर पाहीन ।
पाताळगंगे स्नान करीन ।
परी मी वीट नव्हेन ॥४॥
मातापुर यात्रे जाईन ।
सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगे स्नान करीन ।
परी मी वीट नव्हेन ॥५॥
कोल्हापूरी यात्रे जाईन ।
महालक्ष्मी पाहीन ।
विशाळतीर्थी स्नान करीन ।
परी मी वीट नव्हेन ॥६॥
एका अंगुष्टी तप करीन ।
पृथ्वीपात्रचि लाहीन ।
देह कर्वती देईन ।
परी मी वीट नव्हेन ॥७॥
बहुता पुण्यांच्या सायासी ।
चरण जोडले विटेसी ।
निवृत्तीदासु म्हणे परियेसी ।
परी मी वीट नव्हेन ॥८॥

अर्थ :
परमात्मा हीच कोणी वीट अशी भावना करुन माऊली म्हणतात. मी, काशी प्रयाग इत्यादी क्षेत्रात जाऊन त्रिवेणीचे स्नान करीन परंतु त्यामुळे वीट म्हणजे परमात्मरुप होणार नाही. हे पांडुरगा, मी परमात्मस्वरुप केव्हा होईल. तसेच गोदावरी यात्रेला जाईन, बारा वर्षे साधने करुन काही मायिक फळ मिळविन तसेच अब्जक तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे वीट मात्र होणार नाही मल्लिकार्जुन क्षेत्राला जाऊन श्रीशैल्य पर्वताचे शिखर पाहीन, तसेच पाताळ गंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. मातापूर यात्रेला जाऊन सह्याद्री पर्वत पाहीन आणि त्याठिकाणी असलेल्या गहनगंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. कोल्हापूर यात्रेला जाईन, महालक्ष्मीचे दर्शन घेईन, शिंगणापूर विशाल तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करीन, सर्व पृथ्वी प्राप्त करुन घेईन, देह करवतीने कापन देईल. पण या करण्याने मी वीट मात्र होणार नाही. भगवत्प्राप्तीची उत्सुकता लागलेला भक्त म्हणत आहे. की, अनेक जन्मीच्या महान पुण्याईन मला पांडुरंगरायांचे दर्शन झाले. तरी पण त्याच्या पायाखालची वीट होणार नाही. म्हणजे मला ती वीट होण्याचे भाग्य सहसा लाभणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग