वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

काय शरीरापे काम । कृ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078518 · अभंग क्र. ९१७

917.
काय शरीरापे काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करू ॥१॥
देईन हाक नारायणा । ते तो नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धावेल ॥धृपद॥
सातांपाचांचे गोठले । प्रारब्धे आकारले । आता हे संचले । असो भोग सांभाळी ॥२॥
फावली ते बरवी संधि । सावधान करू बुद्धी । तुका म्हणे मधी । कोठे नेघे विसावा ॥३॥

अर्थ :
शरीराला हरी भजनाचे शिवाय दुसरे काय काम आहे जे काही कर्म आपल्या वाट्याला आले आहे ते उचित मार्गाने करावे तेंव्हा हरीचे प्रेम व कृपा आपल्याला मिळेल त्यावेळेला हरीचे प्रेम मिळेल. नारायणाला प्रेमाने हाक मारील मग बंधने कशी राहतील ? मग माझी प्रेमाची हाक ऐकून तो पंढरीचा राणा धावत माझ्या कडे येईल. हे शरीर सात धातू व पंच महाभूते यांच्या सहाय्याने बनले आहे व प्रारब्धाने हे आकाराला आले आहे मग हे भोग भोगण्या करिता त्याच्या स्वाधीन राहु. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या प्रारब्धाने हा नर देह आपल्याला प्राप्त झाला आहे आता हीच संधी साधून बुद्धी सावध करून विश्रांती न सतत या देवा ला हाक मारत राहू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग