हरिविण न दिसे जनवन आ
193.
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य ते पूर्णिमा सोळाकळी ॥१॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखो तारांगणे । अवघा हरि होणे हेंचि घेवो ॥२॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळी । भरलासे गोपाळी दुमदुमीत ॥3 ॥३॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनीचा धाम गूजगम्य ॥4 ॥४॥
अर्थ:
पोर्णिमेचा पुर्ण चंद्र अंगात 16 कळा घेऊन त्या सर्वाना जसा व्यापुन असतो तसे हे जन वन सर्वकाही हरिने व्यापले आहे. त्याच्या शिवाय आम्हाला काही दिसत नाही. संपूर्ण जगत व्यापलेल्या हरिमुळे आम्ही चंद्र सुर्य रश्मी तारांगणे पाहात नाही तिथे ही त्या हरिलाच पाहतो. आकाश व पृथ्वी ह्यातील पोकळी पासुन पृथ्वीला ही आम्ही हरिरुपात पाहतो.निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथ त्यांच्या गुह्य स्थानातील निरंजनी घरात राहतात व त्या मुळे मी निष्काम होऊन त्याला पाहायचा प्रयत्न करतो.
