वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

काय काय करितो या मना

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072921 · अभंग क्र. ४०७५

4075.
काय काय करितो या मना । परी नाइके नारायणा । करू नये त्याची करी विवंचना । नेऊ पतना आदरिले ॥१॥
भलतिये सवे धावे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडे काही कपट । घात बळकट मांडियेला ॥२॥
न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळे आकाशा । घाली उडी बळे चि देखोनि फासा । केलो या दोषा पाहुणा ॥३॥
चेतवूनि इंद्रिये सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसे चांडाळ अनिवार हे ॥४॥
आता काय ऐसे करावे यासी । बहुत जाचिलो केलो कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धाव मज ऐसी परी झाली ॥५॥

अर्थ :
हे नारायणा माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी मी काय काय करतो आहे काय सांगू परंतू ते माझे काही ऐकतच नाही. जे करु नये त्याचीच विवंचना त्याच्याच विषयी हाव ते मन धरते आणि मला पतनाला नेऊ पहाते. माझे मन भलत्याच विषयांकडे सैराटपणे धावत जाते मग त्या वाटेमध्ये काटे कुटे द-या आहेत की काय हे देखील ते पहात नाही. या मनाने कोणत्याही प्रकारचा विचार न करता बळकटपणाने माझा घातच करण्याचे ठरवलेले आहे. अहो या मनाला भ्रमण करण्यासाठी दहा दिशा, सप्त पाताळ आणि आकाश देखील पुरत नाही. देवा ज्या ठिकाणी माझे चांगले होणार नाही अशा ठिकाणचा फासा पाहून हे मन बळेच तेथे उडी घालते आहे अशा प्रकारे याने मला सर्व दोषाचा पाहूणाच करुन ठेवलेला आहे. माझ्या मनाने माझ्या इंद्रियांमध्ये काम, क्रोध, आशा, तृष्णा या सर्वांना चेतवून दिले आहे या मनाने सर्व दुष्टांना जागृत करुन माझी चांगली शुध्द बुध्दी माझ्यापासून दूर केली आणि त्याने माझी रायाच केली अगदी राळ करुन टाकली म्हणजे माझी फजि

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग