वैकुंठीचे वैभव पंढरी
334.
वैकुंठीचे वैभव पंढरीसी आले । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥
बहुतांसी लाभ देता घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥
योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहता विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥
एका जनार्दनी सुखाचे माहेर । बरवे भीमातीर उत्तम ते ॥५॥
