वसुदेव, देवकी कृष्णा
585.
वसुदेव, देवकी कृष्णाला म्हणतात-“स्थानमानातीता ।
रूप वर्णापरता । वर्तवी स्वसत्ता हरिहर हरि रे॥
त्रिगुणी नाकळसी । मोहना श्रीदेवा ।
शेषादिका न वर्णवे रे॥
परत वाचा । जेथे रिघु नव्हे वेदाचा ।
अगुणरूपधारी तूचि बा रे॥
तो तू आम्हा कैसे । निजरू दाखविसी ।
धन्य तुझा महिमा हरि रे ॥१॥
तुज नमो निश्चिता ब्रह्मबोधा ।
न कळसी मनबुद्धि भेदा ।
गुरूवाक्य अनुभवी । जाणवी जो ।
खुणे तयासी न दिसे आपदा॥धृ॥
सप्तही पाताळे । दशदिशा मंडळे ।
चंद्रसूर्य तुझे उदरी । ताराग्रह वरूणादिक ।
रीबाबळी देख । सामाविली तुवा श्रीहरी ।
विराटस्वरूपा अनुपा । न कळसी निजरूपा ।
दाखविसी नयनी कुसरी॥ चतुर्भुज कैसा ।
नयनी दाखविसी । काय वर्णू तुझी थोरी ॥२॥
सहजसिद्धा । सच्चिदानंदकंदा ।
विश्वतारका स्वामी तू हरि रे ।
काय पुण्य केले । न कळे कवणे ।
जन्मी लाधलो आम्ही तुज रे॥
केवी आम्हा तू । लाधसी कृपाळा ।
कंस आहे तु शत्रु रे॥
मारिली बालके । ज्येष्ठे तुजहुनी ।
ते लोपी चतुर्भुज रूप रे ॥३॥
दैवहीना कायेची । मागणी होय ।
अभागीया राज्यपद हे ।
कामधेनु काय । साधे दारिद्र्यासी ।
मिष्टान्न रोगीया पाहे॥
कल्पतरूतळी काय । असोनिया ।
दैव जवे साह्य नोहे॥
ऐसे आम्हा तू । केवी होसी प्राप्त ।
माझे मन कळले हे” ॥४॥
ऐकोनिया स्तवन । दोघांचे पै ।
कैसा संतोषला कृष्णराणा॥
“तपसामुग्रीने । तुम्ही मागितले ।
मजला, होईल नारायणा॥
मग मी तीन वेळा । पुत्र झालो तुमचा ।
तिसरा गे हाचि जाणा॥”
म्हणोनिया रूप । दाखविले चतुर्भुज ।
बहिणी जाणे त्याची खुणा ॥५॥
