वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 211. पिंगळा

पिंगळा बोले महाद्वार

🙏 4. संत नामदेव · ABH-082159 · अभंग क्र. २११७

2117.
पिंगळा बोले महाद्वारी | निशा सरली दिशा चारी |उठा उठा हो श्रीह्री | उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥
देवा शकुन ऐकाबा ॥ धृ ॥संत साधु अपरिमित | अवघा भरियेला थाट |टाळ विणे वाद्य वांजत | आवडी मंजुळ स्वरे गात ॥२॥
नादे अंबर दणाणले | तेहतीस कोटी देव मिळाले |आवडी पहावया आले | स्वर्ग सुखाते विसरले ॥३॥
भई रखुमाई माते | उठवा उठवा श्रीरंगाते |नारद तुंबर गायनाते | कर जोडूनि हनुमंत ॥४॥
उठिला सांवळा वनमाळी | आनंदली भक्तमंडळी |जयजयकारे पिटली टाळी | विठ्ठलनामे दिधली आरोळी ॥५॥
पिंगळा आनंदला मनी | तेजे न माये गगनी |हर्षे घातली लोळणी | शिंपी नामा तुझे चरणी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग