नाम घेता मन निवे । ज
167.
नाम घेता मन निवे । जिव्हे अमृतचि स्त्रवे ।
होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगले रंगले । तुझ्या चरणी स्थिरावले ।
केलिया विठ्ठले । ऐसी कृपा जाणावी ॥२॥
झाले भोजनसे दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे ।
धालियाच्या ऐसे । अंगा येती उदगार ॥३॥
सुख भेटी आले सुखा । निध सांपडला मुखा ।
तुका म्हणे लेखा । आता नाही आनंदा ॥४॥
