वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

निर्मिला म्हणसी परेच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074787 · अभंग क्र. २८७

287.
निर्मिला म्हणसी परेचा विस्तार ।
तेथे हा विचार वायांवीण ॥
परनाही तेथे अरूते कैचे ।
आदिमध्य साचे कळिका हरि ॥
नाही ते सन्मान विकृति उपरमु ।
त्या दीप दीप समु शेजेबाजे ॥
बापरखुमादेविवरू परेसी परता ।
हा विचारू अरूता दिसे भान ॥

अर्थ :
शास्त्रवचनाचा आधार घेऊन परमात्म्यापासून हा त्रैलोक्याचा विस्तार झाला आहे असे म्हणतोस परंतु हा विचार अयोग्य आहे. त्या परमात्मवस्तुचे ठिकाणी अलीकडे, पलीकडे, आदि, मध्य, अन्त वगैरे काही नसून सत्यत्वाने ज्ञानस्वरूप हरिच आहे. त्याला मोठेपणा नाही, विकार नाही, अर्थात उपरमही नाही. रखुमाईचे पती व माझे पिता हे स्वयंप्रकाशी आहेत. तसाच तो सर्वत्र समान आहे. त्यांच्या ठिकाणी ते परेहुनही पर आहते. असे म्हणणे देखील निकृष्ट आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग