वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जनासी तारक विठ्ठलचि

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090041 · अभंग क्र. १५

15.
जनासी तारक विठ्ठलचि एक । केलासे विवेक सनकादिकी ॥१॥
ते रुप वोळले पंढरीस देखा । द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥२॥
उगवले बिंब अद्वैत स्वयंभ । नाम हे सुलभ विठ्ठल राज ॥३॥
निवृत्तिचे गुज विठ्ठल सहज । गयनी राजे मज सांगितले ॥४॥

अर्थ:
सनकादिक संतांनी विचार मंथनातुन जो विचार सांगतिला त्या प्रमाणे एक विठ्ठलच जगतासी तारक आहे. संत ह्याला विवेक म्हणतात. तो श्री विठ्ठल आपले अद्वैत असे निर्गुण रुप सोडुन इकडे सगुण रुपात आकारला आहे. ज्या सुलभते नित्य सुर्यबिंब उगवते तेवढ्याच सुलभतेने त्याचे नाम प्रगट होते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गयनीनाथ कृपे मुळे नाम सुलभ आहे हे गुज मला कळले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग