वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पंढरीमहात्म्य व पांड

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088418 · अभंग क्र. २९१

291.
पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

हा गे पहा विटे उभा ।
सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥
देखे सकळाचेही भाव ।
अध्यक्ष हे याचे नांव ॥२॥
जेथे तेथे जैसा तैसा ।
नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥३॥
निळा म्हणे माझया जिवी ।
ठेला जडोनी तो गोसावी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग