मजचि का करणे लागला व
161.
मजचि का करणे लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥
कैशी करू सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
आणिक तो दुजा नाही अधिकार । कैसा हा विचार करू आता ॥३॥
चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढे दिसे ॥४॥