चहुं वाचांपरता चहुं
285.
चहुं वाचांपरता चहुं वेदा निरुता । न कळे तत्त्वता चतुर्वक्त्रा ॥१॥
चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरु जातु घरोघरी ॥२॥
चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिका ॥३॥
एका जनार्दनी चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥
