वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

जतन करीन जीवे । शुद्

🙏 3. संत तुकाराम · ABH-078503 · अभंग क्र. ५७३

573.
जतन करीन जीवे । शुद्धभावे करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हे धन । जीवन अंतकाळीचे ॥धृपद॥
वर्दळ हे संचित सारू । बरवा करू उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटी साठवू ॥३॥

अर्थ :
विठ्ठल नाम हे अतिशय दुर्लभ आहे ते मी व्यवस्तीत जतन करून ठेवीन. विठ्ठल हे धन देहाच्या अंतः काळी सुद्धा उपयोगी पडणारे धन आहे माझे परम जीवन आहे. संचित कर्म ची बाकी सर्व वर्ग बाजूला सारून विठ्ठलनामाचा उत्तम प्रकारचा व्यवहार करू. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल रुपी धन आम्ही आमच्या छोट्याशा हृदय पेटीमध्ये साठवून ठेवू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग