वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भक्ताचे आचरित आपणचि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075980 · अभंग क्र. ३९५

395.
भक्ताचे आचरित आपणचि होय ।
भगवंताची साय सारीच ना ॥१॥
कीर्तनी आदर शांति क्षमा वसे ।
देह जाता कैसे दंडळेना ॥२॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य वोतले ।
प्रेम वोसंडले सर्वकाळ ॥३॥
क्रिया कर्म जे जे अर्पी ईश्वरासी ।
अखंड वाचेसी रामराम ॥४॥
अर्वाचक बोल नयेचि मुखासी ।
केवी पतिव्रतेसी परपुरूष सीवे ॥५॥
सर्वांभूती भाव संततची धरी ।
नमस्कार करी भूतमात्रा ॥६॥
अगर्वता मनी संता लोटांगण ।
आठवी चरण श्रीगुरूचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे भक्त आचरित ।
तयासी भगवंत जवळी असे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग