वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 75. श्रीकृष्णाचे एका गोपी वरील प्रेम व श्रुती रुपी गोपींचा श्रीकृष्ण शोध

श्रीकृष्णाचे एका गोप

🙏 4. संत नामदेव · ABH-083539 · अभंग क्र. १५२

152.
श्रीकृष्णाचे एका गोपीवरील प्रेम व श्रुती रुपी गोपींचा श्रीकृष्ण शोध

ऐकावे चरित्र परीक्षितिराया । बरोबरी जाया एक असे ॥१॥
तोडोनिया पुष्पे करी अलंकार । घालीत श्रीधर तिजवरी ॥२॥
नये क्षणभरी योगियांचे ध्यानी । घालितसे वेणी आवडीने ॥३॥
वंदियेली शिवे चरणींची गंगा । करीतसे भांगा नीट तीच्या ॥४॥
गोपिकांच्या वेषे प्रगटल्या श्रुती । गुह्य हे तुजप्रती सांगितले ॥५॥
घेवोनिया तिसी गेला कुंजवना । वज्रांकुश चिन्हा उमटती ॥६॥
गोपिकांचा मेळा येतसे तांतदी । युगाऐसी घडी झाली तया ॥७॥
नलगेची शोध शीणती सकळा । न जाती गोकुळा नामा ह्मणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग