वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

चिरे आणूनिया वेष्टले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089856 · अभंग क्र. १५०

150.
चिरे आणूनिया वेष्टले ।
गोवळ अवघेचि शृंगारले ।
येरेयेरा म्हणती भले ।
गौरव घ्या रे मामाचा ॥१॥
चिरे गुंडिती माजेसी ।
उंच पटके ते पायासी ।
झगे वेष्टूनिया शिरासी ।
विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥
ऐसे शृंगारिले गोवळ ।
पुढे चालिले भार सकळ ।
तव ते धनुरयागींचे वीर प्रबळ ।
घ्या घ्या म्हणोनी धाविले ॥३॥
कृष्णे बळरामे देखिले ।
अवघ्यांपुढे मग ते झाले ।
धनुर्धारी वेग केले ।
परि ते न चले बळ त्यांचे ॥४॥
घ्या घ्या म्हणोनी हाका देती ।
शंकस्फुरणे ठाईंचि करिती ।
परी ते गोवळची समस्ती ।
वेष्टूनिया घेतले ॥५॥
धनुष्या लाऊनि बाण ।
विंधावे तो माजि शिरोन ।
गोवळी घेतली ते हिरोन ।
आणि मोडुनी सांडिली ॥६॥
निळा म्हणे एक एका ।
नपुरतीची युध्द तबका ॥
निपातिले फेडिली शंका ।
आणि पुढे संचरले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग