वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 256. गारुड ३९४०

गारुड ३९४०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087029 · अभंग क्र. ३९४०

3940.
गारुड ३९४०

सद्गुरू विघ्नहरू ब्रह्मलंबोदरू भावेंकेला प्रणिपातु । भक्ति सरस्वती चैतन्य शक्तितिचा मी झालो अंकितु । संतसज्जन जनीं जनार्दन । अवधान त्यासी मागतु । गारूडाची गती गाईनतुम्हांप्रती सादर परिसा दृष्टांतु ॥१॥ जा जा जा रेजा जा जा रेजा वादी वादका कायसा तुझा पाडु । तुजवरी बोधे दोलक वाहील घेईन मागलासुडू ॥धृ.॥ अहंगांवगुंड वादक खरा । परदेशी बोधदुसरा । संतसभेपाशीं गर्जत आलो आमुचा निवाडकरा । बोधातें देखुनी वादक कैसा क्रोधे कांपेथरथरां । हा जीवहत्यारा येथे कोठे आला दांत खायकरकरां ॥२॥ या या रे या या या रे या मदगर्वी होभिऊनका तुम्ही पोटी । केवळ ज्ञानतें विषयी वेचलेंबोधाची कायसी गोष्टी ॥धृ.॥ पंचभुतांमाजी अहंगांवगुंड बीद्रेवाहे वितंड । देहबळें कैसा सबळ जालाआकळिले ब्रह्मांड । जो जो भेटे त्यासी पंचभूतेलावीजिंतीलेंवादी उदंड । त्यावरी बोधे विडा उचलिलाठेचिन तयाचे तोंड ॥३॥ जा जा जा.॥चैतन्याचायावा आणूनि देहभावाबंदीम्यां घातले जीवा । त्याचेसोडवणेथोर थोर आले न सुटे तयाच्या देवा । देवाMEEदानवा दैत्या मानवा न साहवे माझा यावा । विवेकासारख्या बंदीम्यांघातीला । बोधाचा कायसाकेवा ॥४॥ या या या.॥विवेक बंदी हे मिथ्याउपाधी विवेकी बोधीली बुद्धी । जीवा जीवत्व बंधनते मिथ्या ज्ञान ते विवेक छेदी । इंद्रियांचे कर्म नकळे तुज वर्मं विवेकी विषयसिद्धी । अहो भुली तूंजालासी वादका । जिंतीलासी त्रिशुद्धी ॥५॥ जाजा जा.॥विषयाची उंडी लावीन तोंडी । पाडीत्याची मुरकुंडी । उंडी संगळी गिळी ऐसा बळी कोणीनाही ब्रह्मांडी । इंद्र पराशर ब्रह्मादिशंकर लोळविलीथोर थोर धेंडी । तेथेंबोधतें बापुडे कायसे मजपुढेकेवि राहे पडीपाडी ॥६॥ या या या.॥कपिलेहनुमंतें भीष्मे नारदे गट केली तुझी उंडी । राज्यकरूनियां विदेही जनक उंडी केली तेणेमुंडी । शुकदेवेंतुजरंभे देखतांमारिलें तोंडीच्या तोंडी । एवढीमज बोधाची ख्याती मा के विं तुळसी तूपडिपाडी ॥७॥ जा जा जा. । कामाचा चेडालावीन पुढा हालों नेदी मागा पुढा । समुळ कामगिळी ऐसा बळी कोणी नाही निधडा । संन्यासीवनवासी दिगंबर तापसी भेणे रिघती गिरीकडां । तेथे स्वप्नदृष्टी खरकोटी लंगोटी वीर्याचा होतसेसडा ॥८॥ या या या.॥तुझ्या कामाची गोष्ट समुळखोटी परतोनी पाहे पांदिठी । आत्मा आत्मी मुळीचनाहीं काम क्रिया केवी उठी । विषयाचेंगोडपण तेंचिब्रह्मपूर्ण हे नकळे कामा कामाठी । कामाचा निजकामजाला आत्मारामचेडाउपडिला ब्रह्मदृष्टी ॥९॥ जाजा जा.॥क्रोध म्हैशासुर करी गुरगुर लावीन तुझेंपाठी । जिव्हारीं झोंबेल कवणा न सुटे मारियलेजगजेठी । दुर्वास कपिल मुनी बळे घोळसीलेसनकादिक वैकुंठी । तया क्रोधापुढे सदा बोध दडेत्यासी कोण आणि दृष्टी॥१०॥ यायाया. ॥माझीशांती गाय तुझा क्रोध खाय त्याचेतूबळ वानिसी । शांतीचेनिं मंत्र मंत्रोनीयां की पंचाक्षरी केले ऋषी । बद्रिनारायणापुढे सदा क्रोध रडे तै तू कायझालासी । कामक्रोध जित भिक्षुने धरिले आता तूंकोठे पळसीं ॥११॥ जा जा जा.॥ममता लाठीअत्यंत खोटी फोडीन तुझीघाटी । हे लाठी उपडीअथवा तोडी ऐसा नाही जगजेठी । माझे ज्ञान मोठेतुझे ज्ञान खोटे ममता ठाकिलें कोट्यानकोटी । ममतेपुढे बोध बापुडे पळाले उठाउठी॥१२॥ यायाया.॥देहीं देहाची ममतामाझेंमाझेंम्हणतां कोणतू नेणसी फुडें । देह तंव बापुडे अचतेन मढे माझेकोण म्हणे कुडे । मुळ मुळी पहाता देही देहमिथ्याममता समुळ उडे । ममतेंचे बळ पडीलेपोकळ काठीस्वय उपडे ॥१३॥ जा जा जा.॥मोहाचे खेडेपाहतांकुडेंमरण आलेरोकडें । विवेकाचेंबळ मोहेंचिसकळ आवरिले धडफुडे । मोह विकल्पें गाढालाविल्या फुडा बोध काय बापुडे । विकल्पाचा माराबोध केला पुरा । जैत आले आम्हांगाढें ॥१४॥ याया या.॥विकल्प बळे मोह सबळ सांगसी तयाचेंरूप । हे बोलणे फुडें समूळ कुडे न कळे मोहोस्वरूप । संकल्प विकल्प मनाचे रूप मन ते स्वयंचिद्रुप । चिट्ठपा पुढा मोहाचा रगाडा खेडें मोडिलेसहित विकल्प जा जा जा. ॥१५॥ असत्याचीकडी लोंभे कढें गोढी पाडीता पाडीन बुडी । सत्यवादी परम म्हणवितां हे धर्म त्यासीही चढलीफुडी असत्याची गाठी बांधिली सृष्टी ते गाठी कवणसोडी । असत्याचे बळे जहाले प्रबळ बोधाचे दांतमी पाडी ॥१६॥ याया या.॥आहे तेंनदेखे नाहींतेदेखे त्यानांवअसत्यपाही । रज्जुसपैखादला कोणपां मेला हे समुळ मुळीच नाही । असत्याची गोठीसमूळ खोटी तेणेंतूजिंकीसी कायी । सत्याचेनि बळेंबोध प्रबळला जिवेंचि मारिला ठायी ॥१७॥ जाजा जा.॥दातेविण नुसधि प्रमदा । व्याधि लावीलअधोद्वारा । दृष्टीची देखता जिचे विख चढे भुलविलेंसुरनरां । विखाची लहरी चढे घरोघरी कांपतातीथरथरा । व्याधीचेनी विखें जिंतीला देख बोधमारीला पुरा ॥१८॥ या या या.॥प्रमदा व्याधीअंधो संधि अध: पात्याते बाधी । देहावयव प्रमदानांव हे आत्मत्वीं नाही शुद्धीं । प्रमदा बोध नाहीप्रबुद्धां हे तंव वेद प्रसिद्धी । बोधे वादक तळासिआणिला मारिलासि त्रिशुद्धी ॥१९॥ जा जा जा.॥बोधा तुझे बळ कळलें सकळ गुरूत्व तुझिये गांठी । गुरूशिष्य म्या धनलोभासाठी जितिलेकोट्यानकोटी । धनलोभावरीगुरूचें आसन शिष्यसोडी त्यांच्या गाठी । गुरूशिष्यामाजी विकल्प नांदेबोध पळे उठाउठी॥२०॥या या या. ॥गुरूशिष्याचा भेद छेदी बोधधनलोभाचा छेदी कंद । धन मान प्रतिष्ठा केवळ विष्टा हाही झाला प्रतिबोध । गुरू तो चैतन्य शिष्य तो चैतन्यघन दोही मुळीचनाहीं भेद । वादकाविरूद्ध सोडविली रंगी गर्जतउभा बोध ॥२१॥ जा जा जा.॥मजपाशीं चांगअनंत एक नाग लावीन तुझे जिव्हारी । तोझोंबल्यावरी सगळे गिळी आत बाहेर नुरवी उरीयाचेनि बळे वादक जिंकीले विजयी झालाचराचरी । नाग देखोनिया वादक धाके भेणे कांपेथरथरी ॥२२॥ या या या.॥जीवीत्व सांडुनिशिवत्वामाजी वादके लपणी केला थारा । अंगलपवुनि डोळा चुकवुनि दडोनि ठेला पुरा । तेथसद्गुरू कृपा शोधूनि पाहता धाके कांपे थरथरा । सबळ केवळ परदे तोडूनि देह नागविलाखरा॥२३॥जा जा जा.॥वेद वादाचा डाबुकवाजत होता त्याचा त्यानेंचि सांडीला नादु । शब्दहोता तो नि:शब्द झाला सहजी खुंटला अनुवादूं । पादकाचा सखा जीवलग जीवेची मारीला भेदु । साधनाच्या कोटी आटावाटी । विजयी झालाबोधु ॥२४॥ जा जा जा. । जिंतीले बोधे वादेंबोधीला अद्वैत वदे । जीव शिव पदें जाणोनिया कींआनंद कोंदे आनंदे ॥धृ.॥ अहं सोडोनियां सोहंभावेंवादकें बोधाचेधरिलें पााय । शरण आलो आतांमारू नको केवळ तुझी मी गाय । गाय गारूड गायत्यासी मी मस्तक वाहे । बोधा वादा दोघा ऐक्यताजाली समाधाने सुख होये ॥२५॥ जा जा जा. रेजिंतीले । शरण आले त्यासी नाही मरण बोधेअलिंगीला अहंभाव । संकल्प विकल्प जन्मदु:खदरिद्र केले वाव । स्वराज्य देऊनी स्वपदी स्थापिलाफिटला देह संदेह । एका जनार्दनी ऐक्यता पावोनब्रह्म झाला स्वयमेव ॥२६॥ जा जा रे जिंतीले॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग