गीता गीता ऐसे वदता प
616.
गीता गीता ऐसे वदता पै वाणी ।
विश्वंभर निजरूप होईल पै प्राणी ।
संग्रह करिता गीता, “जन्मांतर खाणी ।
नाही” ऐसे वदला व्यासहि निर्वाणी ॥१॥
जयदेवी जयदेवी जय भगवद्गीते ।
ऐसे वद तू रसने भगवद्रुपजीविते ।
ऐसे वद तू रसने भगवद्रुपजीविते॥धृ॥
श्रवणे गीता अथवा पाठांतर गीता ।
झाली तरि साची हरि विक्रित निजभक्ता ।
विशेष अर्थान्वय जरि सांगे मुखे वक्ता ।
तोचि हरीरूप जाणा देहचारी असता ॥२॥
जन्मांतरी अतिदोषी गीता म्हणता ते तरले
अगणित नेणो झाले हरिरूपी ते ।
गीता तारक कलियुगी जाणती अनुभवी ते ।
गीता-पाठक होती हरीरूप जाणा ते ॥३॥
’गंगा म्हणता गीता, गंगा सरी न पावे ।
अवले पोहता बुडती म्हणवुनी सरी न सामावे ।
गीता गीता म्हणत मूर्खहि तरती स्वभावे ।
म्हणवुनि गीता तारक केली हे देवे ॥४॥
उदार गंभीर गीता सकला फलदाती ।
माता उपमा न पवे उदार अतिकीर्ति ॥५॥
पठणे श्रवणे सकला एकचि फलप्राप्ती ।
बहिणी अनुदिन हृदयी ध्याते निजभक्ती ॥६॥
