वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

पेंडारा दाऊनिया थोकस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074647 · अभंग क्र. ८९०

890.
पेंडारा दाऊनिया थोकसी ।
देखिले पण केवी जाये अंग लपविसी ।
तरी वेधा काय करिसी ।
मा शहाणपण तुझे नव्हे रे गोंवळा ॥१॥
आम्ही एकवीध जीवे तुंवा केले आधातुरे ।
वर्षावो वोसरलिया वोल्हासु जाय ।
तैसी न होत प्रेमळ उखरे गोंवळा ॥२॥
देठी गुंफलिया फुले डाळलिया आहाच तव काही न दिसे रे ।
परी घ्राण इंद्रियांच्या अंगसुखा समर्थ कोण असे रे गोंवळा ॥३॥
या बोला मानवोनी बापरखुमादेविवरे विठ्ठले
दिधले आपआपणियाते ।
तै पासुनी ते लपणेंची पारूषले उभा पंढरिये येणे वेष रे गोंवळा ॥४॥

अर्थ :
पेंडाऱ्या म्हणजे लुटाणाऱ्या श्रीकृष्णा आम्हांला संसार दाखवून आपण मात्र त्यातच लपून राहिला आहेस. तशा जीवांना तुझी प्राप्ती नाही हे खरे पण आम्ही तुला ओळखला आहे. तू कोठे जाशील? तू आपले स्वरूप लपवून असतोस परंतु अंतःकरणांत तुझ्या स्वरूपाचा सारखा वेध असल्यामुळे आता तु काय करशील. आता तु लपण्याचा प्रयत्न करणे हे शहाणपणाचे काम नाही. आम्ही एकविध भावाने, जीव तुझ्या ठिकाणी ठेऊन संसार सोडुन तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी आम्ही 'आधातुरे' म्हणजे तुझ्या स्वरूपाशिवाय दुसरा आधारच नाही असे आहोत. तुझे ठिकाणी आमचे असलेले निर्मळ प्रेम रेताड जमीनीवर वर्षाव होऊन ओसरून गेल्यावर ओलावाही जसा निघून जातो. तसे आमचे नाही. झाडावर असलेली फूल काढून त्याचा हार केला तर सुगंधाच्या दृष्टीने डोळ्याला त्याचे महत्व नाही. पण घ्राणेंद्रिय अंगाने सुगंध घेण्यास समर्थ आहेत. तसे आम्ही वरून दिसायला गबाळ असलो तरी निर्मळ भक्तिभावाने त्या फुलाच्या सुगंधावरचे आहोत. या आमच्या खेळण्यांत असलेला आमचा निर्मळ भाव माहित झाल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने आपले आत्मस्वरूप आम्हाला दिले आणि तेव्हा पासून निर्गुणरूपांने लपण्याचे सोडून देऊन भक्तांकरिता पंढरीस कटेवर हात ठेऊन तोच श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग