वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ११, बुद्धी रुपी सखिशी संवाद अभंग ८२१ ते ८३४

एकी धांवे सुनाट एकीन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074284 · अभंग क्र. ८२२

822.
एकी धांवे सुनाट एकीने धरीले बेट ।
एकीने शेवट साधियेला ॥१॥
कोणे तत्त्वी हरि कैसीयासी परी ।
नांदे कवणे घरी सांगिजेसु ॥२॥
सखी सांगे बाई भावो धरी देही ।
एकारूपा सोयी येईल घरा ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल अवचिता ।
निवृत्ति समता सांगितले ॥४॥

अर्थ :
कांही एक विचार न करता फुकट किरकोळ साधनांमध्ये म्हणजे दान व्रतादिकामध्ये धावत सुटली. एकीने म्हणजे सांख्यादि तत्त्वविषयक विचार करणारी तिने स्थूल सूक्ष्मसंघातरूपी बेटांत शोध सुरू केला, तिसरीने म्हणजे वेदांत विचार करणाऱ्या तिने परमात्मप्राप्ती करून घेतली. वस्तुतः कोणत्या प्रकाराने, कोणत्या तत्त्वरूपी घरांमध्ये हरि नांदत आहे. असे मला सांगा हो. तिला दुसरी उत्तर देते, बाई, देहरूपी घरांत निष्ठावंत भावाने शोध केला तर तोच या नरदेहरूपी घरांत एकरूपाने प्रतितीला येईल. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच विटेवर समचरणाने एकाएकी उभा आहते. असे निवृत्तीरायांनी सांगितले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग