का करिसी सोस मायेचा
673.
का करिसी सोस मायेचा असोस | नव्हे तुज सौरस नामेविण ॥१॥
नामचि हा मंत्र नामचि हो तंत्र | नामेविण पवित्र न होसी देखा ॥२॥
तिही लोकी पाहता नामेविण सर्वथा | अच्युत म्हणता पुण्य कोटी ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म आदिअंत नेम | ते विटेवरी सम उभे असे ॥४॥
