रात्री माजी स्वप्न द
3986.
रात्री माजी स्वप्न देखिले । परपुरुषांचेघर पळाले । तेथे नागवें आडवें आले । तेणेंउघड्यासी गिळीलें।१॥नवल माझे तुम्ही पहा । उगवें नुगवतां उगेच रहा ॥धृ.॥ माझ्या नवलाचीपरी । खाली कुंभारवरतेंचाक फेरी । लक्षलागे तोचियेईना हरि । ऐशी नवलाची कोण परी ॥२॥ नवलपाहुन बहु भ्याले । या जगामध्ये नाही आले । तेस्वदेहासी मुकले । ऐशापरी नरनारी ठकले ॥३॥ या नवलासी गिळुन । एक राहीला जनार्दन । एकाजर्नादनी शरण । तो नवली नाही भिन्न ॥४॥
