वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अखंड तमासा डोळा देख

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075106 · अभंग क्र. ४३१

431.
अखंड तमासा डोळा देख निका ।
काळा निळा पारवा बाईयांनो ॥१॥
सदोदित नयनी नयन हारपे ।
निळ्याचे स्वरूपे मनी वसो ॥२॥
अकरा वेगळे नाही बा आणिक ।
माझे नेत्री देख शुध्द ज्योती ॥३॥
ज्ञानोबाची वाणी पूर्णरूपी घ्यावी ।
देहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥

अर्थ :
तुम्ही आपल्या डोळ्यांनी काळ्या निळ्या पारव्या रंगरूपानी नटलेल्या जगताचा देखावा पहा. त्या परमात्म्या कडे सतत डोळे लावले असता डोळ्याचा डोळेपणा विसरून नीलवर्णरूप असलेला जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन वसुन राहाते. व तसे झाले म्हणजे दहा इंद्रियापलीकडील जे अकरावे मन ते परमात्मरूप होते. तद्व्यतिरिक्त कांहीही स्फुरत नसते व अशी स्थिती झाली असता माझ्या डोळ्यातील शुद्ध तेजाची ज्योत प्रतीतीला येते. माझ्या सांगण्याचा पूर्ण विचार करून या देहांत ती आत्मज्योत पहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग