वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

देह हा सादर पाहावा न

🙏 3. संत तुकाराम · ABH-077559 · अभंग क्र. ४४३

443.
देह हा सादर पाहावा निश्चिंत । सर्व सुख एथे नाम आहे ॥१॥
ब्रम्ह जे देखणे द्वैत जेव्हा गेले । शरीर ते झाले ब्रम्हरूप ॥धृपद॥
यजन याजन तप व्रते करिती । विकल्पे नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख एथे आहे । भ्रांति दूर पाहे टाकुनिया ॥३॥

अर्थ :
देहाविषयी विवेकाने विचार केला, तर असे दिसून येते कि हरीचे नाम या असूनही सुख प्राप्त करण्यास आधार आहे. ज्या वेळी द्वैत बुद्धी निरास होतो, त्या वेळी बेम्हचा साक्षात्कार होतो व शरीर ब्रम्हरूप होते. कित्येक लोक यद्न्य करतात किंवा करवितात. तप करतात, व्रते धरतात. पण त्यांच्या मनात फलाचा हेतू असतो आणि देहाचे त्याच्या शी ममत्व जडलेले असल्यामुळे ते शुध्द पुण्याईळा अंतरतात. एका हरीच्या नामामध्ये सर्व सुख आहे, पण देहादी सर्व वस्तू आपल्याला स.ुख देतील हि भ्रांती टाकून जर तुम्ही पाहाल, तरच हे तुम्हाला कळून येईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग