वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › २, हरिपाठ अभंग ५८ ते ८४

चहू वेदी जाण साहीशास

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074939 · अभंग क्र. ५९

59.
चहू वेदी जाण साहीशास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वाया तू दुर्गमा न भाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

अर्थ :
चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे हे हरिनामाची महती गात आहेत. दह्याचे घुसळण करुन जसे लोणी काढतात तसे ह्यातील हरीनामाचे लोणी काढुन बाकीचा असार कथा भाग सोडुन द्यावा. जीव व शिवाचे एकच आधिष्ठान हरिनाम आहे. जींवाने उगाच दुर्गम गोष्टीत का मन घालावे. वैकुंठात असलेल्या हरिचा पाठ मी करतो जो सर्वत्र घनदाटपणे वसला आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग