(हिंदीपदे)
3939.
(हिंदीपदे)
तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहा झड करे ॥१॥
ताहा एक तु ही ताहा एक तु ही । ताहा एक तु ही रे बाबा हम तुम्ह नही ॥धृपद॥
दिदार देखो भले नही किसे पछाने कोय । सच्चा नही पकड सके झुटा झुटे रोय ॥२॥
किसे कहे मेरा किन्हे सती लिया बास । नही मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारा तो ही ॥४॥
भला लिया भेक मुंढे आपना नफा देख । कहे तुका सो ही सखा हाक आल्ला एक ॥५॥
अर्थ :
अरे तू लोकांचा व्देष करतोस, त्यांचे डोके फोडतोस, त्यांचा ऊर कुटतोस हे वाईट आहे त्यामुळेच तर लोक तुला भितात अरे आम्ही तुम्ही एक हरीचेच रुप आहेत येथे कोणीही परके नाहीत. आपण जर ज्ञानदृष्टीने पाहिले तर कोणीही कोणाला ओळखत नाही आणि ख-याला कोणीही धरु शकत नाही म्हणजे जे सत्य आहे त्याला कोणीही धरु शकत नाही त्यामुळे तो खोटे खोटेच रडतो आहे. अरे तू कोणाला माझे म्हणतो आणि कोणत्या भाषाला सत्य मानतोस आपले मुख्य जीवन म्हणजे हरीचे स्वरुप आहे त्या स्वरुपाला तू मिळत नाहीस त्यामुळे तू तुझ्या जीवनाचा व्यर्थ नाश करुन घेत आहेस. त्यामुळे हे बाबांनो तुम्ही एक ऐका जे होणार आहे ते होणारच आहे तुमच्या पुढे वाटयाला जे काही अन्न येत असेल ते तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून, मिसळून एकमेकांना वाटून खा आणि सर्वत्र एक हरी आहे असा अनुभव घेत राहा तेच चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, स्वत:च्या स्वहितासाठी तू आपले डोके मुंडून गोसाव्याचे रुप धारण केले आहेस पण आपला सखा एक हरी आहे हे समजून तू त्याला सतत हाक मारत राहा.
