वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

सगुणी निर्गुण निर्गु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074427 · अभंग क्र. ४७८

478.
सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण ।
दोन्ही भिन्नपण नसे मुळी ॥१॥
हेम अलंकार अलंकारी हेम ।
मृण्मयेचि धाम धाम तेचि ॥२॥
किंचित् महत उपाधि कल्पित ।
मुळी ते अंशीक एकमेव ॥३॥
इह तेचि पर पिंड ते ब्रह्मांड ।
ब्रह्मचि अखंड ज्ञानदेव ॥४॥

अर्थ :
जसे सोने तेच अलंकार व अलंकार तेच सोने किंवा मातीने केलेले घर आणि माती एकच त्याप्रमाण सगुण निर्गुण यांच्यात भेट नसुन ते दोन्ही एकच आहेत. उपाधि लहान मोठी कल्पिल्यामुळे त्यांच्यात भेद दिसतो. पण उपाधिचा निरास केल्यानंतर सगुण व निर्गुण हे दोन्ही एक परमात्मस्वरुप आहे म्हणुन इहलोक असो अथवा परलोक असो. व्यष्टिरुय असो. अथवा समष्टिरुप ब्रह्मांड असो सर्वत्र एक परमात्माच भरलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग