वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वासुदेव)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079462 · अभंग क्र. ३९२५

3925.
(वासुदेव)
मनु राजा एके देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हावरी गा ॥१॥
म्हणउनि आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥धृपद॥
सवे घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥२॥
पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराग्य धर्म येती ।
स्थिर केली जी आचपळे होती । सद्धि आणुनि लाविली पंथी गा ॥३॥
केले उपकार सांगो काय । बाप न करी ऐसी माय ।
धर्म त्याच्या हे देखियेले पाय । दिले अखय अभय दान गा ॥४॥
होतो पीडत हिंडता गांव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणे अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥५॥

अर्थ :
मन नावाचा एक राजा आहे तो देहरुपी गावामधे नांदत आहे आणि त्याला दोन बायका आहेत. पुत्रपौत्रांनी तो अतिशय संपन्न आहे त्याने आमच्यावर फार मोठी कृपा केली आहे. म्हणून तर या देशाला आलो नाहीतर चुकलो असतो तर वेगळयाच दिशेने गेलो असतो. तो मन नावाचा राजा अतिशय दाता आहे त्याने मला इच्छेचे दान दिले व तो मला येऊन भेटल्यावर त्याने मला चांगला मार्ग दाखविला. त्याच्याबरोबर त्याचे चार सुलक्षणी मुले घेऊन तो मनरुपी राजा आला. त्याने कडेकाटे चुकवून आम्हाला आणले आणि त्याच्याबरोबर त्याचे चार मुले कोणती आली आहेत ती तुम्ही ऐका. पुढे भक्तिने हाताला धरले आहे व मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येत आहेत. जे अचपळ होते त्यांना स्थिर केले आणि सिध्द मंडळींना आणून मार्गाला लावले. अहो आईबाप देखील असे उपकार करणार नाहीत असे उपकार त्यांनी आमच्या

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग