वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकरी परत आल्या नं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079456 · अभंग क्र. ३६०५

3605.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणी मस्तक हे ॥१॥
जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेईन पायवणी धोवोनिया ॥२॥
तुका म्हणे माझे भांडवल सुचे । संता हे ठायींच ठावे आहे ॥३॥

अर्थ :
पवित्र होण्याकरता पंढरीहून आलेल्या वारकऱ्यांच्या चरणावर मी लोळण घेऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवीन. मी माझे हात जोडून त्यांना विनंती करीन आणि धावत जाऊन त्यांचे चरणतीर्थ घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे भांडवल एवढेच आहे हे संतांना देखील माहित आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग