जन तुम्ही करा रे उदी
2139.
जन तुम्ही करा रे उदीम | वाचे स्मरा नारायण |तो तुम्हा चुकवीळ जन्ममरण | मायाभ्रमण चुकविल ॥१॥
तारू करूनी शरीराचे | केणे भरिले हरिनामाचे |शिड उभविले सत्त्वाचे | वल्हे पडती धर्माचे ॥२॥
आत्मयांची करुनी कुबे काठी | वारा लागतो जगजेठी |तारू चाले थोरा नेटी | विठ्ठल भेटी पंढरीये ॥३॥
तारवा सांपडले बंदर | राया विठोबाचे नगर |ते बा संतांचे माहेर | विष्णुदास म्हणे नामा ॥४॥
