वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

आधीच तू ज्ञान वरी जा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074223 · अभंग क्र. ५९०

590.
आधीच तू ज्ञान वरी जाले उन्मन ।
हरि हे जीवन हृदयी आले ॥१॥
स्थिरावले ध्यान ज्ञानाचिये वृत्ति ।
विज्ञान संपत्ति साधलिया ॥२॥
अंधकारपट नासला समतेज ।
रामरूपी पैज दीपज्ञान ॥३॥
संतशांत शांति उलथीचा ठसा ।
कृष्णरूपी दिशा तेजोतेज ॥४॥
अलक्ष लक्षिते अगोचर पर ।
तेथेही गव्हर संचले असे ॥५॥
ज्ञानदेव सुखी जालीसे विश्रांति ।
परमानंद चित्ती निरंतर ॥६॥

अर्थ :
निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा तू मूळचा ज्ञानरूप असून तुझ्या मनाची स्थिती उन्मन होऊन गेली आहे. कारण सर्व जीवांचे जीवन जो श्रीहरी तो तुझ्या हृदयांत प्रगट आहे. ही ज्ञानसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञान ध्यानाच्या वृत्ति आपोआपच स्थिर झाल्या. रामकृष्णरूपी परमात्म्याचे ठिकाणी ज्ञानदीप प्रदीप्त झाल्यामुळे प्रपंचरूप अंधकाराचा सर्व पट नष्ट झाला. त्याचप्रमाणे शांत्यादिकाची स्थिती झाली. कारण कृष्णरूपाचे तेजाने सर्वदिशा प्रकाशित झाल्या. वस्तुतः अगोचर अलक्ष असे जे परमात्मतत्त्व त्याचठिकाणी हे रामकृष्ण रूपही गुप्तरूपाने राहिले आहे. मला परमानंद प्राप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला विश्रांती मिळाली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग