वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

जन्ममरणाते नाहीच गणि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074424 · अभंग क्र. ५१२

512.
जन्ममरणाते नाहीच गणित ।
सूर्य जैसा होत उदय अस्त ॥१॥
वासनेच्या योगे न निमे कल्पना ।
याचि लागी नाना योनी भोगी ॥२॥
पापपुण्य दोन्ही साठवीत आहे ।
असुयेशी जाये अधउर्ध्व ॥३॥
समत्वे इहींचि जाण जन्म घरी ।
आथी इयेपरी तिन्हीजेसु ॥४॥
त्रिभुवनाहुनि राहिला निराळा ।
ज्ञानेश्वरी लीला निरंजनी ॥५॥

अर्थ :
जीवांना सूर्याच्या उदयास्ताप्रमाणे किती जन्म होतात याची गणतीच नाही. कारण अनादि अनंत वासनेच्या योगाने जन्ममरणाची कल्पना नाहीसी होत नाही. म्हणून नाना योनीत जन्म घेऊन पापपुण्याचा साठा करतात. आणि प्राणाच्या सहाय्याने स्वर्ग नरकाला जातात व पापपुण्य समानतेने मनुष्य जन्म घेतात. असे जन्माचे तीन प्रकार आहेत. आम्ही गुरूकृपेने पापपुण्यातीत झाल्यामुळे स्वर्गनरक व मनुष्यजन्म याहून मुक्त झालो, आता आम्ही ब्रह्मनंदामध्ये लीला करीत राहू. असे माऊली ज्ञाऩेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग