संत तुकाराम म. वासुद
61.
संत तुकाराम म. वासुदेव
राम राम दोनी अक्षरे । सुलभ आणि सोपारे ।
जागा मागिले पाहारे । सेवटिचे गोड ते चि खरे गा ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि ।
वाजवी चिपिळया । टाळ घागऱ्या घोषे गा ॥धृ॥
गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाही आणिका नांवा ।
दान जाणोनिया करी आवा । न ठेवी उरी कांही ठेवा गा ॥२॥
एक वेळा जाणविती । धरूनिया राहा चित्ती ।
नेघे भार सांडी कामा हाती । नीज घेउनि फिरती गा ॥३॥
सुपात्री सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव ।
जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाही ठाव गा ॥४॥
शूर दान जीवे उदार । नाही वासुदेवी विसर ।
किर्ती वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥
