ईश्वर तो देव छाया ते
527.
ईश्वर तो देव छाया ते शीव ।
प्रती छाया जीव तिन्ही भेद ॥१॥
एक तेचि सूत्र तिन्हीसी मिळुनी ।
जाणती ते ज्ञानी आत्मविद ॥२॥
जे अनिर्वचनीय ते मूळ प्रकृति ।
ब्रह्मा ऐशी शक्ति तियेचि पै ॥३॥
ब्रह्मा विष्णु रुद्र तियेचे पै अंग ।
मुळी सृष्टि जग गोसाविणी ॥४॥
ब्रह्म तेचि भास आभास जाहले ।
ज्ञानदेव बोले निवृत्तिदास ॥५॥
अर्थ :
सर्वाधिष्ठान परमात्मा जो मुख्य देव त्याची मायेत जी छाया म्हणजे तो शीव आणि अंतःकरणांत त्या शीवाचे जे प्रतिबिंब तो जीव अस हे तीन प्रकार आहेत? आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत. ते या तीन्ही वस्तु ब्रह्मरुपच शुद्ध परमात्म्याच्या आश्रित जी अनिर्वचनीय माया तीच मूळ प्रकृति असुन तिला ब्रह्माची शक्ती असेही म्हणतात. तिच्यापासून ब्रह्म, विष्णु शंकर अशी ईश्वरास नांवे आली. म्हणजे सृष्टीची मुख्य मालकीणही ब्रह्माश्रित माया आहे. ती माया आपल्यामध्ये प्रतिबिंब घेऊन जीव व शीव दाखविते. असे निवृतीदास ज्ञानदेव सांगतात.
